marathi-vyakran-vibhakti-ani-vibhaktiche-prakar, मराठी व्याकरण विभक्ती व विभक्तीचे प्रत्यय, marathi vyakaran vibhakti che prakar, vibhakti che prakar
-: मराठी व्याकरण विभक्ती व विभक्तीचे प्रत्यय :-
विभक्ती व विभक्तीचे प्रत्यय :-
कोणतीही भाषा जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्या भाषेच्या व्याकरण अधिक चांगल्या रीतीने समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात आपण मराठी भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणेसाठी मराठी व्याकरण समजून घेणार आहोत.
मराठी व्याकरणामध्ये विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय याला मराठी व्याकरणा मध्ये फारच महत्त्व आहे.
( English Title :- Marathi Vyakran Vibhakti Ani Vibhaktiche Prakar )
वाचा व उत्तरे लिहा.
प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले.
अ ) वरील शब्द समूह वाक्य आहे काय ?
आ ) वरील शब्द समूहातून अर्थबोध होतो का ?
इ ) अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा.
जेव्हा आपण ' प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले ' अशी रचना करतो तेव्हाच ते अर्थपूर्ण वाक्य होते.
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना ' विभक्ती ' असे म्हणतात.
विभक्तीचे वैशिष्टये :-
अ ) नामांना व सर्वनामांना प्रत्यय लागून विभक्तीची रूप तयार होतात.
आ ) हो रुपे क्रियापद व इतर शब्द यांच्यातील संबंधांशी निगडीत असतात.
लक्षात ठेवा.
अ ) नामांचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रुप तयार करण्यासाठी त्यांच्यापुढे जी अक्षरे जोडली जातात, त्यांना ' प्रत्यय ' असे म्हणतात.
आ ) विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रुपात जो बदल होतो , त्याला ' सामान्यरुप ' म्हणतात .
विभक्तीचे प्रत्यय :-
खालील तक्ता वाचा.
' घर ' या नामाची विभक्तीचे रुपे पाहा.
विभक्ती एकवचन आणि अनेकवचन माहितीपर फलक
लक्षात ठेवा.
अ ) प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो .
आ ) यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यांत होतो.
उदाहरणार्थ :- चतुर्थी एकवचन ' ते ' , सप्तमी एकवचन ' आ '
इ ) अनेकवचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार येतो .
ई ) नामाप्रमाणे सर्वनामांनाही प्रत्यय लावून रुपे तयार होतात.
COMMENTS