marathi vyakran kartari prayog, kartari prayog marathi grammar, मराठी व्याकरण कर्तरी प्रयोग, marathi vyakran kartari prayog exercise,
मराठी व्याकरण कर्तरी प्रयोग
( English Title :- Marathi Vyakran Kartari Prayog )
खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.
मी पत्र लिहितो.
अ ) लिहिणारा तो कोण - कर्ता
आ ) लिहिले जाणारे ते काय - कर्म
इ ) वाक्यातील क्रिया कोणती - क्रियापद
वाक्यातील कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते, वाक्यातील
कर्ता -- क्रियापद , कर्म --- क्रियापद या संबंधाला ' प्रयोग ' असे म्हणतात.
प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
१) कर्तरी प्रयोग
२) कर्मणी प्रयोग
३) भावे प्रयोग
१) कर्तरी प्रयोग :-
वाक्याच्या शेवटी ' येणे ' या क्रियापदाचे योग्य रुप वापरुन वाक्ये पुन्हा लिहा.
१) मी शाळेतून आत्ताच ----- ( येणे )
२) ती शाळेतून आत्ताच ---- ( येणे )
३) रवी शाळेतून आत्ताच ---- ( येणे )
४) विद्यार्थी शाळेतून आत्ताच ---- ( येणे )
जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग , वचन व पुरुषा नुसार क्रियापदाचे रुप बदलते , तेव्हा त्यास ' कर्तरी प्रयोग ' असे म्हणतात .
कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये :-
कर्ता प्रथमा विभक्तीत असतो .
कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असते.
वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वाचन व पुरुष यानुसार बदलते.
उदाहरणार्थ :-
खालील वाक्यामध्ये ' जाणे ' हे क्रियापद कर्त्याप्रमाणे बदललेले दिसते.
अ ) तो शाळेत जातो.
आ ) ती शाळेत जाते.
इ ) ते शाळेत जातात.
ई ) तू शाळेत जातोस.
कंसातील क्रियापदाचे योग्य रुप वापरुन वाक्ये पूर्ण करा.
१) मुली क्रिकेट ---- ( खेळणे )
२) तुम्ही क्रिकेट ---- ( खेळणे )
३) आम्ही क्रिकेट ---- ( खेळणे )
४) जॉन क्रिकेट ---- ( खेळणे )
५) समीर क्रिकेट ---- ( खेळणे )
COMMENTS